नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय रेल्वेत ५,९६९ पदांसाठी जागा रिक्त! – Indian Railway Recruitment 2024

0

Indian Railway Recruitment 2024 – सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तरुणांसाठी भरतीच्या अधिसूचना जारी केल्या आहेत. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी बंपर भरती जारी केली आहे. या भरतीची माहिती एम्प्लॉयमेंट न्यूज पेपरमध्ये (19 ते 26 जानेवारी 2024) देण्यात आली आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर, अर्जाची तारखी देखील RRB द्वारे घोषित केल्या जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन (online) अर्ज प्रक्रिया २० जानेवारी २०२४ पासून सुरु होईल. अर्जाची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन माध्यमातून फॉर्म भरू शकतील. अर्ज (Application) कसा करायचा? वयोमर्यादा किती? जाणून घेऊया

रेल्वे भर्ती बोर्ड असिस्टंट लोको पायलटसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या मोहिमेद्वारे असिस्टंट लोको पायलटच्या एकूण ५,९६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

RRB ALP Recruitment 2024

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करणाऱ्या SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि तृतीय श्रेणीतील उमेदवारांना फक्त 250 रुपये शुल्क भरावे लागेल.

अर्ज कसा कराल?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IndianRailways.gov.in अधिकृत साइटला भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी अधिकृत साइटला भेट द्यावी लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.