परदेशी शिक्षणासाठी ६९ टक्के भारतीय विद्यार्थी अमेरिकेला

foreign education for indian students

0

प्राप्त अहवाल नुसार, भारतीय विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला पसंती दिली असून, साधारण ६९ टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जात असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. ब्रिटनला शिक्षण घेण्यासाठी ५४ टक्के, तर कॅनडात शिक्षण घेण्याला ४३ टक्के विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. ऑस्ट्रेलियाला शिक्षण घेण्यासाठी २७ टक्के विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. परदेशात शिक्षण घेण्याबाबत ‘ऑक्सफर्ड इंटरनॅशनल’च्या ‘एसजीएमआय’ने ‘द नॉलेज पार्टनरशिप’ सोबत याबाबत सर्वेक्षण केले आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पसंती दिल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी देश निवडण्यासंदर्भात शिक्षणाचा दर्जा आणि नामांकित विद्यापीठांना प्राधान्य दिले आहे. साधारण ४५ टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या दर्जाला प्राधान्य दिले. Foreign education for indian students. 

नामांकीत विद्यापीठांना पसंती ‘अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या ४२ टक्के विद्यार्थ्यांनी नामांकित विद्यापीठांना पसंती दिली. त्याचप्रमाणे ब्रिटनमधील शिक्षणाच्या दर्जाला ५९ टक्के विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले, तर ६१ टक्के विद्यार्थ्यांनी नामांकित विद्यापीठाला पसंती दिली,’ अशी माहिती ‘ऑक्सफर्ड इंटरनॅशनल एज्युकेशन सर्व्हिसेस’चे व्यवस्थापकीय संचालक मोहित गंभीर यांनी दिली.

काय सांगतो अहवाल?
■ अभ्यासक्रमांचे शुल्क परवडण्यासाठी २८ टक्के भारतीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी ब्रिटनची निवड केली, त्यानंतर ऑस्ट्रेलिया (२० टक्के), कॅनडा (१८ टक्के) आणि अमेरिका (९ टक्के) यांचा क्रमांक होता.
■ शिष्यवृत्तीसाठी ३४ टक्के विद्यार्थ्यांनी ऑस्ट्रेलियाची निवड केली. त्यानंतर कॅनडा (३२ टक्के), ब्रिटन (२७ टक्के), अमेरिका (२३ टक्के) यांचा क्रमांक होता.
■ भारत आणि नायजेरियामधील ३५ टक्के विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम व विद्यापीठांची निवड करण्यासाठी माहितीचा प्रमुख स्रोत म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातील करिअर समुपदेशकांची निवड करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.