ई-रेशन कार्डांबाबत मोठी अपडेट, कसे काढलं जात ऑनलाईन E Ration Card 2024

0

सध्या स्वस्त धान्य दुकानदारही बऱ्याचदा या कुटुंबासाठी आलेल्या धान्याची परस्पर काळ्या बाजारात विक्री करण्याचे प्रकार अधून मधून समोर येत असतात. तसेच आपल्याला माहीतच असेल, काही शिधापत्रिका धारक मुळ पत्यावर राहत नसल्याने त्यांना ध्यान्य मिळत नाही. यामुळे गरीब कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात करण्यात आली. बारा अंकी क्रमांकासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि हाताचे ठसे द्यावे लागतात. मात्र यातही आता बदल करण्यात आले आहेत. पुरवठा विभागामार्फत रेशन कार्ड धारकांना या अगोदर हस्तलिखित रेशन कार्ड देण्यात येत होते. शासन निर्णयानुसार आता प्रत्येक रेशन कार्डधारकांना ई – रेशनकार्ड भेटणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांना आता मोबाईल मध्ये रेशन कार्ड ठेवता येईल. रेशनकार्ड धारकांना ई-रेशन कार्ड वाटप करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत चालू होणार असल्याचे कळते.

 

तसेच आता, शिधापत्रिकांसोबत आधार क्रमांक लिंक करण्याची आणि शिधापत्रिकेवरील ई-केवायसी (तुमचा क्लायंट जाणून घ्या) आणि मोबाइल नंबर अपडेट करण्याची अंतिम मुदत २९ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी येथे सांगितले. ज्या ग्राहकांनी अद्याप नोंदणी केलेली नाही किंवा त्यांची माहिती अद्ययावत केली नाही अशा ग्राहकांच्या सोयीसाठी ही तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाने येथे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी विभाग ग्राहकांच्या रेशनकार्डशी आधार क्रमांक लिंक करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 29 फेब्रुवारीपर्यंत जर एखाद्या ग्राहकाने त्यांचा आधार क्रमांक शिधापत्रिकेशी जोडला नाही तर त्यांची रेशनकार्डे तात्पुरती ब्लॉक केली जातील.

 

आता प्रत्येकालाच मिळणार ई-रेशन कार्ड (ई – शिधापत्रिका)

रेशन कार्डधारकांनी संबंधित वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने माहिती भरल्यानंतर ती माहिती संबंधित पुरवठा निरीक्षकाकडे मिळणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रेशन कार्ड धारकांना ई – रेशन कार्ड भेटणार आहे. यामुळे सरकारच्या या निर्णयाचा सर्वत्र स्वागत होत आहे.

ई-रेशन कार्ड चे फायदे व वापर कसा करायचा?

ई – रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणाली मार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांकरिता QR Code आधारित ई – रेशन कार्ड ऑनलाइन व डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई – रेशन कार्ड वर योजनेबाबत अंत्योदय अन्न शिधापत्रिका (AAY), प्रधान्य कुटुंब योजना (PHH) आणि राज्य योजनेअंतर्गत APL Farmer, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत (NPH) असे नमूद करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने ई – रेशन कार्ड (ई – शिधापत्रिका) सुविधा साठी शासन फी आकारणार नाही असा निर्णय शासनाने घेतला.

E-Ration Card Download: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे व राज्य योजनेच्या शिधापत्रिका धारक हे गरीब व गरजुवंत कुटुंबातील लोक आहेत. त्यामुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षण योजनेच्या व राज्य योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना सर्वांनी वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑनलाइन रेशन कार्ड सुविधा/सेवा शुल्क न करता सदरील योजनेची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अर्जदार यांनी ई – रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेनुसार ऑनलाइन ई – रेशनकार्ड (ई – शिधापत्रिका) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ई – रेशनकार्ड कधी मिळणार?

रेशन कार्ड धारकांना 1 सप्टेंबर पासून ई – रेशन कार्ड वाटप करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्याला मार्फत तहसीलदार पुरवठा निरीक्षकांना आदेश देण्यात आले आहेत.

Leave A Reply