CRPF मध्ये बंपर भरती, दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, त्वरित करा अर्ज!

0

दहावी पास (SSC Pass) असाल आणि सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. सीआरपीएफ (CRPF) म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दलात (Central Reserve Police Force) नोकर भरती करण्यात येत आहे. सीआरफीएफ कॉन्सेटबल भरती 2024 ची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 16 जानेवारी 2024 पासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. सीआरफीएफ कॉन्सेटबल भरती 2024 साठी पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशिल जाणून घ्या.

 

CRPF Constable Recruitment 2024 : महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 16 जानेवारी 2024

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024

 

 

CRPF Constable Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पात्र उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापिठातून दहावी पास असणे आवश्यक आहे.

CRPF Constable Recruitment 2024 : वयोमर्यादा

सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी पात्र उमेदवाराचं वय किमान 18 वर्षात आणि कमाल 23 वर्ष आवश्यक आहे.

पगार किती मिळेल?

सीआरपीएफ भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये यादरम्यार पगार मिळेल.

CRPF Constable Recruitment 2024 : अर्ज शुल्क

या भरती मोहिमेअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. अर्ज करणार्‍या अनारक्षित प्रवर्गातील, इतर मागासवर्गीय आणि EWS श्रेणीतील पुरुष उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तर महिला प्रवर्ग, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत साइटवरील अधिसूचना पाहू शकतात.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For crpf.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/lmRY7
👉 ऑनलाईन अर्ज करा अर्ज (16 जानेवारी 2024 पासुन सुरु होतील)https://shorturl.at/dhnI2
✅ अधिकृत वेबसाईटhttps://crpf.gov.in/

Leave A Reply

Your email address will not be published.