घाई करा… रेल्वेत बंपर भरती, 10 वी पास असाल तरीही…
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. विशेष म्हणजे रेल्वेत नोकरी करण्याची मोठी संधी समोर आली आहे. ज्यांना या नोकरीसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे त्यांनी गडबड न करता, पण वेळ न घालवता पटापट अर्ज करावेत. भारतीय रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिपसाठी तब्बल 700 हून अधिक व्हेकन्सी आहेत. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बिलासपूर विभागात प्रशिक्षणार्थींची भरती केली जाईल.
या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2024 ही आहे. अधिसूचनेनुसार, अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 आणि अप्रेंटिसशिप ॲक्ट 1962 अंतर्गत दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात एक वर्षासाठी ही भरती केली जाईल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.
नॅशनल ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर जाऊन दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमधील अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करावा लागेल. अप्रेंटिसशिपमध्ये कोणत्या ड्रेटमध्ये व्हेकन्सी आहेत ते जाणून घेऊया. ट्रेड नाव व्हेकन्सी कारपेंटर 38 कोपा 100 ड्रॉफ्ट्समॅन (सिव्हिल) 10 इलेक्ट्रिशिअन 137 इलेक्ट्रिशिअन (मेकॅनिकल) 05 फिटर 187 मशीनिस्ट 04 पेंटर 42 प्लंबर 25 मेकॅनिक (रेफ्रीजरेटर) 15 SMW 04 स्टेनो इंग्लिश 27 स्टेनो हिंदी 19 डीजल मेकॅनिक 12 टर्नर 04 वेल्डर 18 वायरमॅन 80 केमिकल लॅब असिस्टेंट 04 डिजिटल फोटोग्राफर 02
Railway Bharti 2024 : अप्रेंटिसशिपसाठी पात्रता : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिपसाठी, संबंधित ट्रेडमध्ये ITI सह 10वी/12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असावे. SC/ST उमेदवारांना कमाल वयात 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे आणि माजी सैनिक आणि अपंगांना 10 वर्षांची सूट मिळेल.
Railway Bharti 2024 : अप्रेंटिसशिपसाठी निवड प्रक्रिया : अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांची निवड ही 10वी आणि ITI गुणांच्या आधारे केली जाईल. दोन्हींच्या गुणांना समान वेटेज मिळेल. उमेदवार हा किमान 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा.