रोहित-विराटनंतर आता ‘या’ अष्टपैलू खेळाडूचाही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘रामराम’

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचेही (Ravindra Jadeja) नाव जोडले गेले असून त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र, तो वनडे आणि कसोटीच्या फॉरमॅटमध्ये खेळत राहणार आहे

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) ७ धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली

विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला की, “आता नव्या पिढीने जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे. हा माझा शेवटचा टी २० वर्ल्ड कप होता. जे मिळवायचे होते ते मिळाले आहे. एक दिवस तुम्हाला वाटतं की तुम्ही धावा काढू शकत नाही आणि असं होतं. भगवान महान आहे. फक्त संधी, आताच नाही तर कधी नाही अशी स्थिती होती. भारतासाठी खेळण्याचा टी २० क्रिकेटमधील अखेरचा सामना होता. आम्हाला वर्ल्ड कप उंचावायचा होता, आम्ही तो उंचावला आहे. हे एक खुलं गुपित होतं, सामना हरलो असतो तरी निवृत्ती जाहीर करणार होतो,असे त्याने सांगितले