मुंबई शहरात शिक्षण खातं अक्षरशः डगमगलेलं आहे! उत्तर, पश्चिम आणि दक्षिण या तिन्ही विभागांत शिक्षण उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, लिपिक, शिपाई अशा महत्त्वाच्या पदांपैकी अर्ध्याहून जास्त जागा रिक्त आहेत.
रोजच्या कामकाजासाठी ज्या जागा अत्यावश्यक आहेत, त्या मोकळ्या असल्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था चालक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित राहतायत.
शासकीय योजनांची अंमलबजावणीही खोळंबतेय. शिक्षण खात्यातील निर्णय वेळेत होत नाहीत, फायली पुढं जात नाहीत, आणि शिक्षकांना तर भविष्यनिर्वाह निधी, पदोन्नतीसाठी चक्कर माराव्या लागतात.
थोडकं उदाहरण द्यायचं झालं तर:
-
उत्तर विभाग: ७२ जागांपैकी ४० जागा रिक्त
-
पश्चिम विभाग: ६२ पैकी ३५ जागा रिकामी
-
दक्षिण विभाग: ५५ पैकी ३८ जागा रिक्त
-
शिपाई आणि कनिष्ठ लिपिक यांचं विशेष दुर्लक्ष!
या रिक्ततेमुळे शाळांचं प्रशासन ठप्प झालंय. मंत्रालयातही काही लिपिक तिथं गेलेत, त्यामुळे निरीक्षक कार्यालयात कामच होत नाही.
मुख्याध्यापक संघटनेनं शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र दिलंय – “या जागा तातडीने भरा!”
शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनीही आश्वासन दिलंय की, “मी नव्यानेच पदभार घेतलाय, योग्य ती कारवाई करीन.”